रायझींग स्टार कोल्हापुर, कोवाई रॉकर्स संघांची आगेकुच

आयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धा

पुणे: कोवाई रॉकर्स संघाने हरियाणा आरआडी संघाचा तर रायझींग स्टार कोल्हापुर संघाने मुंबई इलाईट वॉरियर संघाचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्‍ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

लिजेंडस्‌ क्रिकेट अकादमी व पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत सचिन गाडगीळच्या अष्टपैलु कामगिरीच्या बळावर रायझींग स्टार कोल्हापुर संघाने मुंबई इलाईट वॉरियर 81 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना रवीराज मायदेवच्या 28, शैलेष भोसलेच्या 32 तर प्रितेश करनावत व सचिन गाडगीळ यांच्या प्रत्येकी 31 धावांच्या बळावर रायझींग स्टार कोल्हापुर संघाने 15 षटकात 5 बाद 204 धावा केल्या. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सचिन गाडगीळच्या अचूक गोलंदाजीपुढे मुंबई इलाईट वॉरियर संघ 15 षटकात 4 बाद 132 धावात गारद झाला. सुनिल बोहराने 32 तर आशिष छापरीयाने 31 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. सचिन गाडगीळने 10 धावात 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. 31 धावा व 2 गडी बाद करणारा सचिन गाडगीळ सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या सामन्यात वसंत कुमारच्या अषटपैलु कामगिरीच्या जोरावर कोवाई रॉकर्स संघाने हरियाणा आरआडी संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)