रायजिंग काश्‍मीरच्या संपादकांची दहशतवाद्यांकडून हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – ज्येष्ठ पत्रकार आणि रायजिंग़ काश्‍मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची आज दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. श्रीनगरमधील प्रेस कॉलनीतील आपल्या कार्यालयातून बुखारी एका इफ्तार पार्टीसाठी निघाले होते. ते आपल्या मोटरकारमध्ये असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बुखारी यांचा ड्रायव्हर आणि सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. हल्लेखोर पळून गेल्यानंतर तिघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेथे बुखारी यांचा मृत्यू झाला. सन 2000 मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर बुखारी यांना संरक्षण देण्यात आले होते.

जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुखारी यांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्‍त केले आहे. ईदच्य पूर्वसंध्येला दहशतवाद्यांचे हे कृत्य भ्याडपणचे आहे, असे त्या म्हणाल्या. बुखारी यांच्या हत्येने आपल्याला धक्का बसल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे.

-Ads-

रमजाननंतरही जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी जाहीर केलेली युद्धबंदी रमजाननंतरही चालू ठेवावी की नाही, याबाबत चर्चा चालू असतानाच बुखारी याची हत्या झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)