मुंबई – रायगड जिल्ह्यात पोलिसांना स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. त्यामध्ये डिटोनेटर आणि जिलेटीनच्या कांड्यांचाही समावेश आहे. या प्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. सुमारे 965 डिटोनेटर, जिलेटीनच्या 46 कांड्या आणि स्फोटासाठी वापरण्यात येणारे अन्य काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

रायगड जिल्ह्यातील धालघर गावामधील मोहम्मद उमर जाहिर काझी या व्यक्‍तीच्या घरावर छापा घालून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. स्फोटकांचा हा साठा बेकायदेशीर मच्छिमारीसाठी जमा केला गेला असण्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे.

या प्रकरणी अधिक तपास केल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील हातखांबा गावातून शांतिलाल चोकलाल गद्री या आणखी एका व्यक्‍तीसही अटक करण्यात आली आहे.

अरबी समुद्रामध्ये मासेमारी करत असताना झालेल्या स्फोटामुळे काही मच्छिमार जखमी झाले होते. त्याच्या तपासादरम्यान काझी आणि आणखी एक जण मासेमारीसाठी स्फोटके विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे ही छाप्याची कारवाई करण्यात आल्याचे रायगडचे पोलिस अधिक्षक अनिल परसकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)