रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३३८ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने रायगड किल्ल्यावर शिवस्मारक मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सुकन्या आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परंतु या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भागवत यांना निमंत्रण देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. मात्र हा कार्यक्रम शिवस्मारक मंडळाचा असून याच्याशी आपला कोणताही वैयक्तिक संबंध नाही, असे स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिले असल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)