रायगडमध्ये दोन मुलींचा नदीत बुडून मृत्यू

रायगड – कर्जत तालुक्‍यातील कळंब येथे एक दुर्दैवी घटना घडली. आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मतिया सर्फराज पटेल (वय 9) आणि तय्याबा सुहेल ताडे (वय 7) अशी या मुलींची नावे आहेत. त्या दोघींचेही मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

ही दुर्दैवी घटना रायगडमध्ये घडली असून या दोन्हीही मुली आपल्या आईसोबत नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने त्या नदीत पडल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या प्रवाहासोबत वाहत गेल्या. वेळीच मदत न मिळाल्याने त्यांचे प्राण गेले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)