राम रहीम समोर आता आहेत हे पर्याय?

चंदिगड – डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला 2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षनंतर राम रहिमकडे आता फक्त पुढीव पर्यायांचा वापर केला जावू शकतो. राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. मात्र, तज्ज्ञ जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळवणे अथवा मिळणे फारच कठीण आहे.

राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवले जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)