राम रहीम कारागृहात प्रतिदिन २० रूपये कमावतो

नवी दिल्ली: डेरा सच्चा सौदाचा माजी प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रित यांचे कारागृहातील जीवन कसे आहे याबबत नुकतीच माहिती पुढे आली आहे. एके काळी ऐशोआरामाचे जीवन जगलेले हे दोघेही सध्या कारागृहात आहेत. कारागृहातील जीवनाची दोघांनीही सवय करून घेतली आहे.

दरम्यान, दोन साध्वीवर बलात्कार केल्या प्रकरणी राम रहीम सुनारिया कारागृहात २० वर्षे कारावासाची शिक्षा भोगत आहे. कारागृहात त्याला कैद्यांचे कपडे देण्यात आले आहेत. कारागृहात राम रहीम शिस्तपालन विभागात काम करतो. राम रहीमला अद्यापही कारागृहातील शिकाऊ कामगार म्हणूनच ओळखले जाते. कारागृहात त्याचे वर्तन चांगले असल्याचे सांगितले जाते. तो दिवसाकाटी २० रूपये कमावतो.

आतापर्यंत सहकारी कैद्यांनी त्याला कारागृहातील शेतात भाज्या पिकवताना पाहीले आहे. पांढरा कुर्ता आणि पायजम्यात वावरणाऱ्या राम रहिमच्या दाढीचे आणि अंगावरील केस तांबडे झाले आहेत. त्याला नुकतीच त्याची आणि आणि मुलगा भेटायला आले होते. कारागृह प्रशासनाने त्याच्या खात्यावर प्रतिमहिना ५००० रूपये जामा करण्याची सवलत दिली आहे. या पैशातून त्याला कारागृह उपहारगृहातून फळे, समोसा, स्नॅक्स अशा प्रकारच्या गोष्टी घेता येऊ शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)