राम रहीमशी संबंधित ट्विंकल खन्नालाही अनुभव

बलात्काराच्या आरोपाअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बाबा राम रहीम याचा ज्या बॉलिवूड कलाकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला, त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री ट्विंकल खन्ना होय. आता ट्विंकलने राम रहीमविषयीचा एक किस्सा शेअर केला असून, त्यामध्ये राम रहीमच्या समर्थकांकडून तिला कशा पद्धतीने धमक्‍या दिल्या जात होत्या हे सांगितले आहे. ट्विंकलने ब्लॉगच्या माध्यमातून लिहिले की, राम रहीमचा चित्रपट “एमएसजी’ आला तेव्हापासून मी त्याला फॉलो करीत आहे. जेव्हा राम रहीम मुंबईत आला होता तेव्हा मी त्याला एक फोटोही शेअर केला होता. त्यानंतरच राम रहीमच्या समर्थकांनी मला धमक्‍या देण्यास सुरुवात केली होती.’ अशी आपबिती ट्विंकलने सांगितली आहे.

पुढे लिहिताना ट्विंकलने म्हटले की, “मी फोटो शेअर केला तेव्हाच राम रहीमच्या समर्थकांनी मला धमक्‍या दिल्या नव्हत्या तर, यापूर्वीदेखील जेव्हा मी त्याच्यावर एक व्यंगात्मक कॉलम लिहिला होता तेव्हादेखील त्याच्या समर्थकांनी “मला तोंड बंद ठेव’ अशा शब्दांमध्ये धमक्‍या दिल्या होत्या. याच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात राम रहीमचा एक फोटो ट्विंकलने शेअर केला होता. फोटो कॅप्शनमध्ये ट्विंकलने लिहिले होते की, “खरे मोनोसोडियम फॅनक्‍लबचे सर्व लोक आणि मी खूप नशीबवान आहोत. ते माझ्या घराजवळच राहायला आले आहेत.’ ट्विंकलने लिहिलेल्या या कॅप्शनमध्ये “ते’चा अर्थ राम रहीम असा होता.

यावेळी ट्विंकलने तिच्या ब्लॉगमध्ये त्यासर्व बाबांविरोधात लिहिले जे त्यांच्या समर्थकांच्या जोरावर बिझिनेस करीत आहेत. ट्विंकल खन्नाने लिहिले की, “जे प्रॉडक्‍ट बाबा लोक विकतात त्याचा अगोदर त्यांनीच वापर करायला हवा. त्यांचे शॅम्पू आणि कंडिशनरने सर्वात अगोदर या बाबांनी त्यांची दाढी आणि केस धुवायला हवे. यावेळी ट्विंकलने राम रहीमची खिल्ली उडविताना असेही लिहिले की, “जेव्हा “एमएसजी’ रिलीज झाला होता तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत बघण्याचा विचार केला होता. परंतु दोन-चार मित्रांव्यतिरिक्त इतर कोणीही हा चित्रपट बघण्यास तयार झाले नव्हते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)