राम मंदिर बनले नाही, तर सरकार बनणार नाही : उद्धव ठाकरे 

अयोध्या: राम मंदिर नाही तर आता सरकारही नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “सर्व काही कोर्टाच्याच हातात आहे, तर मग निवडणुकीत राम मंदिराचे आश्वासन का दिले जाते?, असा सवाल करत “निवडणुकांआधी सगळे राम-राम करतात, निवडणुकीनंतर आराम करतात,” असा टोलाही त्यांनी लगाविला.

अयोध्येत शिवसेना शाखेचे उदघाटन 
अयोध्यामध्ये पहिल्या शिवसेना शाखेचे उद्‌घाटन अदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदेंसह शिवसेना नेते आणि तेथील स्थानिक नेते उपस्थित होते. याबद्दलची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली. लवकरच अयोध्या येथे शिवसेना सदस्य नोंदणीची सुरवात होणार आहे. हिंदुत्वाच्या नवीन पर्वाची सुरवात करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते शिवसैनिक, रामभक्तांच्या उपस्थितीत व उत्साहात अयोध्येत येथे शिवसेना शाखेचे उद्‌घाटन झाले, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासोबत उद्‌घाटनाचे फोटोही पोस्ट केले आहेत. 

अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी प्रथम पोलीस प्रशासन, यूपी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांचे आभार मानले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राम मंदिर लवकरात लवकर बांधले गेले पाहिजे. त्यासाठी अध्यादेश काढा, कायदा बनवा किंवा इतर मार्ग वापरा, पण राम मंदिर बांधा”. “राम मंदिर बांधल नाही तर पुढे मंदिर बनले, पण हे सरकार नाही बनणार, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.

आतापर्यत राम मंदिर बांधले गेले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर नवचैतन्य मिळाले. मात्र राम अजूनही तुरुंगवासात असल्याची भावना मनात आली. राम मंदिरात जातोय की तुरुंगात जातोय हेच कळत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. “अच्छे दिन’ सारखा राम मंदिराचा मुद्दा ठरल्यास हिंदू आता शांत बसणार नाही. हिंदू बांधवांच्या भावनांशी खेळू नका, असे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)