राम मंदिर प्रकरणात कोर्ट काहीही करू शकत नाही : शिवसेना

मुंबई: राम मंदिर प्रकरणात कोर्ट काहीही करू शकत नाही अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. सर्वोैच्च न्यायालयाने आज या प्रकरणाची सुनावणी जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्याचा जो निर्णय दिला आहे त्यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी हे मत नोंदवले. आज येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की आम्ही सुप्रिम कोर्टाच्या राम मंदिर प्रकरणाविषयीच्या निवड्याकडे फार लक्ष देत नाही. कारण या विषयात कोर्ट काहीच करू शकत नाही असे ते म्हणाले. 25 वर्षांपुर्वी जेव्हा बाबरी मशिद पाडण्यात आली त्यावेळी कोणी कोर्टाला विचारून ही कृती केली नव्हती कोर्टाला विचारून आमचे शेकडो कारसेवक शहीद झाले नव्हते असेही ते म्हणाले.

आम्ही कोर्टाची अनुमती घेऊन अयोध्या विषयाचे कोणतेच आंदोलन हाती घेतलेले नाही. अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी आमची प्रबळ इच्छा आहे. आम्ही पाकिस्तानात राम मंदीर उभारणीची मागणी करीत नाही आहोत आम्हाला प्रभु रामचंद्रांच्या अयोध्येत राम मंदिर हवे आहे. शिवसेनेच्यावतीने उद्धव ठाकरे हे तिकडे जाऊन देशवासियांपुढे अयोध्या विषयी आपली भूमिका मांडणार आहेत असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या अयोध्या विषयीच्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले की शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. तेथे ते रामलल्लाचे दर्शन घेतील तसेच त्यांचे अयोध्येत 4-5 महत्वाचे कार्यक्रम आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)