राम मंदिरासाठी विधेयक आणणार भाजप खासदार; विरोधकांना समर्थन देण्याचे आवाहन

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील मालकीच्या संबंधातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे. परंतु, राम मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.

यासंदर्भात काँग्रेसकडून सातत्याने भाजपला आव्हान देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी राम मंदिर उभारणी संदर्भात हिवाळी अधिवेशनात खाजगी सदस्य विधेयक आणण्याची घोषणा केली आहे.

राकेश सिंह यांनी ट्विट करत म्हंटले कि, आरआरएस आणि भाजपला राम मंदिर बनवण्याची तारीख सातत्याने विचारणाऱ्यांना माझा एक सरळ प्रश्न आहे कि जर मी खाजगी सदस्य विधेयक आणले तर ते माझ्या विधेयकाचे समर्थन करतील का?, असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्षांना विचारला असून त्या ट्विटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, लालू प्रसाद यादव आणि चंद्राबाबू नायडू यांना टॅग केले आहे.

राकेश सिंह म्हणाले कि, कलम ३७७, जल्लीकट्टू, शबरीमाला मंदिर आदी प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्यास किती कालावधी लावला, असा प्रश्न विचारत ते पुढे म्हणाले कि, अयोध्या प्रकरण त्यांची प्राथमिकता नाही. परंतु, हिंदूंचा प्राथमिक मुद्दा आहे, असेही ते म्हणाले आहेत.

काय आहे खाजगी सदस्य विधेयक ?
मंत्र्यांनी आणलेल्या विधेयकाला शासकीय विधेयक म्हणतात, तर एका सदस्याने आणलेल्या विधेयकाला खाजगी सदस्य विधेयक म्हणतात. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारचा वेळ खाजगी विधेयकासाठी राखीव ठेवलेला असतो. खाजगी विधेयक पारित होण्याची शक्यता फारच कमी असते.

दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त जागेवर जानेवारी २०१९ मध्ये सुनावणी होणार असून याच वर्षी लोकसभा निवडणुकाही आहेत. त्यामुळे प्रचाराच्या केंद्रस्थानी राम मंदिराचा मुद्दा राहणार हे निश्चित.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)