राम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन करु ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इशारा 

मुंबई: अयोध्या येथील राम मंदिराच्या कामाला विलंब होणे हे वेदनादायी असून सर्वोच्च न्यायालय योग्य न्याय करेल अशी आशी आहे. पण भविष्यात आवश्‍यकता वाटल्यास राम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन करु,असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीचा मीरा-भाईंदर येथील केशव सृष्टी येथे समारोप झाला. यानंतर भय्याजी जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. राम मंदिराबाबत ते म्हणाले,आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो.पण राम मंदिराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयने लोकभावनेचा आदर करावा.राम मंदिर व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण प्रकरण न्यायालयात असल्याने विलंब होतोय. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. हा कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा विषय आहे. हिंदूच्या भावनेचा आदर करुन सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा.
राम मंदिराबाबत इथर काहीच पर्याय नसल्यास राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा याचा पुनरुच्चार करुन भय्याजी जोशी म्हणाले, दिवाळीपूर्वी चांगली बातमी येईल अशी आशा होती. पण आता ही सुनावणी थेट पुढील वर्षी होणार असल्याने अपेक्षाभंग झाला. राम मंदिरासाठी आम्ही आंदोलन केले. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने काही मर्यादा येतात. पण भविष्यात गरज वाटल्यास राम मंदिरासाठी 1992 सारखे पुन्हा आंदोलन करु.
संघाने हिंदुत्वाचे धडे माझ्याकडून घ्यावेत, असे राहुल गांधींनी म्हटले होते.त्याबाबत बोलताना त्यांनी राहुल गांधी यांना किती गांभीर्याने घ्यावे, याचा आपण विचार केला पाहिजे असे म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली.
रा. स्व. संघाच्या या तीन दिवसीय बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. त्यात 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चिंतन झाल्याची शक्‍यता आहे.राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील निवडणुकीत भाजपाला संघाची मदत लागणार आहे. त्याचीच आखणी शहा-भागवत यांनी केली असावी, असा अंदाज आहे.
भाजप आणि शिवसेना या दोन मित्रांचे काय होणार, शिवसेना भाजपाला ‘टाळी’ देणार का, याबद्दल भय्याजी जोशी यांना विचारले असता, त्यांनी सावध उत्तर दिले. मी भाजपाचाही प्रवक्ता नाही आणि शिवसेनेचाही नाही. युतीचं काय करायचं ते त्यांचे त्यांनी बघून घ्यावे असे ते म्हणाले.राम मंदिराबाबत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या आग्रही भूमिकेचे त्यांनी स्वागत केले.25 नोव्हेंबरला उद्धव अयोध्येला जाणार आहेत.राम मंदिरासाठी सरकावर दबाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या मुद्द्यावर शिवसेनेने संघासोबत यावे असं आमंत्रणही भय्याजी जोशी यांनी दिले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)