राम मंदिरासाठी कायदा बनविण्याची आवश्‍यकता : मोहन भागवत 

नागपूर: राम मंदिर उभारणीसाठी कायदा व्हावा म्हणून सरकारवर दबाव आवश्‍यक आहे. मंदिराच्या निर्माणासाठी संपूर्ण समाज एकवटण्याचे काम आपल्याला करायचे आहे. यावेळी असा जोर लावूया की राम मंदिर निर्माणाचे काम झाल्यावरच जागरणाचं काम थांबवू. राम मंदिराच्या निर्माणानंतर सर्व भांडणे संपतील. त्यामुळे सरकारने आता लवकरात लवकर कायदा बनवण्याची आवश्‍यकता आहे. न्यायालय निर्णय देत नसेल तर सरकारने कायदा बनवावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटना आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे उपराजधानी नागपुरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात हुंकार सभा घेण्यात आली. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारने कायदा बनवावा अशी मागणी केली.

भागवत म्हणाले, समाजाच्या भल्याचे जितके निर्णय आहेत, ते टाळण्याकडेच न्यायालयाचा कल असतो. राम मंदिराचा विषय हा न्यायालयाची प्राथमिकता आहे असे वाटतंच नाही. न्याय उशिरा मिळणे म्हणजेच तो नाकारला जाणे होय. म्हणूनच राम मंदिराचा विषय न्यायालयात असला तरी त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यासोबत, जनहिताचे खटले न्यायालयात प्रलंबित कसे राहतात? रामजन्मभुमीवर इतर कोणी हक्क कसा सांगू शकतो? असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले.

हिंदू धर्म सहनशील आहे म्हणूनच मंदीर उभारणीसाठी विलंब होत आहे. हिंदू धर्मीय श्रद्धाळू आणि सर्व धर्मांचा सन्मान करतात. हिंदू संविधानावर विश्वास ठेवतो, कायद्याने वागतो. समाज कायद्याने चालत नाही, प्रत्येक समाजाची एक संस्कृती चालीरिती असतात. प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकर निर्णय घ्या, असे मोहन भागवत म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)