राम मंदिराशी माझा काही संबंध नाही: शरद यादव

बाराबंकी: ‘अयोध्येतील राम मंदिराशी मला काहीच घेणं-देणं नाही. त्यावर माझी श्रद्धाही नाही. भारतीय संविधानालाही राम मंदिराशी काही घेणे-देणे नाही. मी केवळ जिवंत लोकांची पूजा करतो. मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांचं काम घंटा बडवण्याचं आहे. त्यांनी खुशाल घंटा बडवावी,’ अशी खोचक टीका जनता दल युनायटेडचे माजी अध्यक्ष  शरद यादव यांनी केली. यादव यांच्या या धक्कादायक विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे पत्रकारांशी बोलताना शरद यादव यांनी हे विधान केलं. हे विधान केल्यानंतर लगेचच त्यांनी संविधानाचा आधार घेतला. ‘संविधानातच लिहिलेले नाही तर मी का पूजा करावी? संविधानात पूजा करण्याचे लिहिलेले नाही. संविधानाला अशा गोष्टींशी काही घेणे-देणे नाही,’ असे शरद यादव म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भाजपविरोधात होणाऱ्या महाआघाडीचे  नेतृत्व सामूहिक असेल असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीनंतरच पंतप्रधान पदाबाबत निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देश २० वर्ष मागे गेला आहे. या निर्णयामुळे बँका उद्ध्वस्त झाल्या आहेत, असं सांगतानाच केंद्र सरकारने काश्मीरची वाट लावल्याचा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)