मुंबई – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीबाबत रोज नवीन दावे प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अयोध्येत राम मंदिराची लवकरात लवकर उभारण्याची मागणी केली आहे. तर विश्व हिंदू परिषद आणि सत्ताधारी पक्षातील सदस्यही राम मंदिर उभारणीसाठी जोरदार मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून फटकारे आहे.
काय आहे व्यंगचित्र
राज ठाकरे यांनी ‘हे राम’ या शीर्षकाखाली व्यंगचित्र काढले आहे. या व्यंगचित्रात श्रीराम आणि लक्ष्मण दाखविण्यात आले असून त्यांच्या समोर विश्व हिंदू परिषद, भाजप आणि उद्धव ठाकरे दाखविण्यात आले आहेत. यामध्ये श्रीराम त्यांना म्हणत आहेत कि,अहो, देश घातलात खड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात. अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते ‘राम मंदिर’ नव्हे. असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रात दाखविले आहे.
#AyodhyaRamMandir #GeneralElection2019 #UddhavThackeray #BJPShivsenaAllianceGovernment #VishvaHinduParishad #ChaloAyodhya #RamRajya pic.twitter.com/AgZrilng0F
— Raj Thackeray (@RajThackeray) November 25, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा