मथुरा: अयोध्येतील राम मंदिराच्या विषयावर भाजपचे लोक दुटप्पी भूमिका घेत असून त्यांना राम मंदिराचे आश्‍वासन पुर्ण करता आले नाही त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही असे आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी म्हटले आहे. त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की जर मोदी ट्रिपल तलाकवर संसदेत ठराव मांडू शकत असतील तर त्यांना अयोध्या प्रकरणात संसदेत ठराव करण्यात काय अडचण होती याचे उत्तर त्यांनी हिंदुंना दिले पाहिजे. अनुसुचित जाती जमाती कायद्यावरून भाजप अडचणीत आल्यानंतर त्यांनी लगेच संसदेत ठराव करून स्वत:चा बचाव केला पण त्याचवेळी त्यांना राम मंदिर प्रकरणात कायदा करून हा प्रश्‍न का सोडवता आला नाही असा सवाल त्यांनी केला.

राम मंदिराच्या उभारणीचा विषय आता आम्हीच हाती घेणार आहोत असे नमूद करून ते म्हणाले की यासाठी येत्या 21 ऑक्‍टोबर रोजी आपली संघटना अयोध्येच्या दिशेने एक मोर्चा काढणार आहे. राफेल घोटाळ्याच्या संबंधात विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी सरकारच्या काळात राफेल विमानांच्या किंमती अचानक कशा वाढल्या याचाही खुलासा मोदी सरकारने केला पाहिजे. मोदींनी भाजपला कॉंग्रेसच्याच मार्गाने नेले आहे असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की भाजपत आज आयारामांची चलती आहे. कॉंग्रेस मधून अचानक भाजपमध्ये गेलेल्यांना सर्व सोयी सवलती भाजपमध्ये मिळत आहेत पण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र दुर्लक्षित केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)