राम मंदिराच्या मुद्यांवरून लोकांमध्ये नाराजी

विहिंप अध्यक्ष प्रवीण तोगडिया : कायदा करण्याची मागणी
प्रभात वृत्तसेवा
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षात राममंदिरचा प्रश्‍न मार्गी लावला नाही, त्याचाच परिणाम म्हणून उत्तरप्रदेशच्या गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. आता हिंदूंची सहनशीलता संपत चालली नाही. अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी त्वरित संसदेत कायदा करा, अशी मागणी करीत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी राम मंदिराच्या मुद्यांवरून लोकांमध्ये नाराजी असून, आता कोणतेही “बहाना’ चालणार नाही, असा इशारा त्यांनी नरेंद्र मोदींना दिला.

तोगडिया यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत राममंदिराच्या मुद्‌द्‌यावर आपली भूमिका मांडली. गेल्या 32 वर्षापासून अयोध्येत राम ंदिर निर्माणासाठी आंदोलन करीत आहेत. आता मात्र सर्वोच्च न्यायालयीन निवाड्यावर राम मंदिर उभारण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केवळ जमिनीच्या मालकीहक्काबद्दल निवाडा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदूच्या विरोधात निर्णय दिल्यास
राममंदिर उभारण्यासाठी 1100 चौरस मीटरचा भूखंड मिळेल. उर्वरित 67 एकर जागेमध्ये मशीद उभी राहील, हे मान्य नाही. सध्याची परिस्थिती पाहता ही जमीन बाबरी मशिदासाठी जाईल, अशी भिती वाटत आहे.
भारतातील जनतेने पूर्ण बहुमताने केंद्रात सरकार आणले. राममंदिरासाठी भाजपने जनतेला वचन दिले आहे. हे वचन कायदा करून पूर्ण करावे. या संदर्भात न्यायालयाने याचा निवडा ऐकण्यासाठी जनतेनी बहुमत दिलेले नाही, याकडे तोगडिया यांनी लक्ष वेधले. जीएसटीसाठी रात्री उशिरापर्यंत संसदेत कायदा केला जातो, मग राम मंदिरासाठी का केला जात नाही. राम मंदिरासाठी त्वरित कायदा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सत्तेत बसणाऱ्या व्यक्‍तींकडून दबाव
अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून सर्व प्रकारने दबाव टाकला जात आहे. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लावण्याचा विषय बंद करा, यासाठी सत्तेत बसणाऱ्या व्यक्‍तींकडून दबाव निर्माण होत आहे. राम मंदिरावरून आमची भूमिका कायम तीच राहणार आहे, असेही तोगडिया यांनी सांगितले. दबाव कोण टाकतो, हे मात्र वेळेवर आल्यानंतर सर्व स्पष्ट करेल, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करा
गेल्या तीन वर्षापूर्वी गुजरातमध्ये कापसाला प्रतिक्‍विंटल 6 हजार रुपये भाव दिला होता. आता मात्र 3 हजार रुपये भाव आहे. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांना कर्जाची वेळ आली असून, त्यामुळेच शेतकऱ्यांची आत्महत्येची घटना होत आहे. हीच स्थिती महाराष्ट्राची आहे. सध्या शेतकरी “आसीयू’मध्ये आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी तोगडिया यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)