राम मंदिराचा मुद्दाही जुमलाच आहे का – उद्धव ठाकरे 

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावरुन भाजपसह विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीच्या काळात भाजपला राम मंदिराची आठवण येते.मात्र निवडणूक झाल्यानंतर भाजप राम मंदिराची घोषणा विसरतो. अच्छे दिन जुमला होता, तसाच राम मंदिराचा मुद्दाही जुमला आहे का? याचा सोक्षमोक्ष लागायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी राम मंदिराचा विषय घेतला का घेतला? अयोध्येचा दौरा आम्ही करतोय म्हणून काही लोक आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना टीका करु द्या. निवडणुका आल्या म्हणून आम्ही राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला. त्यामुळे आमच्यावर टीका होईल. पण निवडणुका आल्या की राम मंदिराचा मुद्दा येणारच, असे ते म्हणाले.

-Ads-

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेंबरला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा सध्या राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. तसेच भाजपने याच सुमारास सादु-संताचा जनाग्रह मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. सेनेच्या मोर्चाचे महत्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा दावा होत असला तरी त्यामुळे राजकारण तापण्याची व अशांतता निर्माण होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)