राम मंदिरपेक्षा गरिबांच्या तोंडात दोन घास गेले तर देवळात गेल्यासारखेच वाटेल- नाना

पुणे:गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल त्यामुळे तुम्हाला राम मंदिर बांधयाचे असेल तर बांधा, असे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, पुण्यात खडकवासला धरणातील गाळ उपसा करुन त्याला पुनरुज्जिवीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात नाना पाटेकर बोलत होते.

राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन आज करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे उदघाटन झाले.

दरम्यान, नाना पाटेकर यांना ‘आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते, मात्र दुष्काळावर चर्चा होत नाही ?’ असा प्रश्न विचारण्यात आला.त्यावर नानांनी कणखर उत्तर दिले. कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर बांधा.

तसेच, यंदा राज्यात दुष्काळ आहे, मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाइलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ती भिकारी नाहीत. त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)