राम नदीकाठाचे सुशोभिकरण एप्रिलपासून

पुणे- वृक्ष प्राधिकरणातर्फे राबविण्यात येणाऱ्या राम नदीकाठ सुशोभिकरण उपक्रमांतर्गत घोरपडी येथे वनिकरण करण्यात येणार आहे. एप्रिलपासून हे काम सुरू होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे.

नदीकाठ परिसर कचरामुक्त करणे, त्याठिकाणी वृक्षाची लागवड व संवर्धन असे उपक्रम प्राधिकरणतर्फे हाती घेण्यात आले आहेत. याच अंतर्गत घोरपडी येथील रामनदी काठ परिसरात सुमारे 1 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यात वड, पिंपळ, चिंच यांसारख्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचा समावेश असले. यामुळे नदीकाठ कचरामुक्त होण्यास मदत मिळेल. तसेच वृक्षसंवर्धानालाही हातभार लागेल, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव दयानंद घाडगे यांनी दिली. ते म्हणाले, रामनदी सुशोभिकरणासाठी प्राधिकरणाकडून गेले अनेक दिवस पाठपुरावा सुरू होता.

या प्रकल्पाला नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता मिळाली. तसेच या प्रकल्पासाठी 50 लाखांचा निधीदेखील मंजूर केला. एप्रिलमध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. दोन वर्षे चालणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार झाडे लावण्याचे प्राधिकरणाचे नियोजन आहे. या झाडांची लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी प्राधिकरणाकडे राहील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)