राम कदम यांना पक्षातून त्वरित निलंबित करा ; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक!

मुंबई: ‘पसंत असणाऱ्या मुलीला पळवून आणण्यास मदत करणार’ असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांसह संघटना रस्त्यावर उतरून राम कदमांविरोधात आंदोलने करत आहेत.

दरम्यान, “देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे महाराष्ट्रातील भगिनींची तुम्हाला मनापासून काळजी असेल व राम कदम यांच्या आक्षेपार्ह विधानांना आपला पाठिंबा नसेल आणि यापुढे कोणीही फूस लावून मुलींना पळवू नये, असे आपल्याला वाटत असल्यास, आपण राम कदम यांना त्वरित पक्षातून निलंबित करावे. अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच, जोपर्यंत पोलिस राम कदम यांच्या विरोधात एफआयआर दाखल करत नाहीत तोपर्यंत पोलिस ठाण्यात तीव्र ठिय्या आंदोलन सुरूच राहणार, गुन्हा दाखल न केल्यास महिलांविषयी अवमानास्पद वक्तव्याबद्दल न्यायालयात दाद मागणार! असल्याचे आमदार विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)