पुणे: ‘पसंत असणाऱ्या मुलीला पळवून आणण्यास मदत करणार’ असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांसह संघटना रस्त्यावर उतरून राम कदमांविरोधात आंदोलने करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राम कदम यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. तसेच राम कदम यांच्या विरोधात सह्यांची मोहीम देखील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी द्वारे राबवण्यात येणार आहे.

तत्पूर्वी आज सकाळीच राम कदम यांनी सोशल मीडियाद्वारे घडलेल्या प्रकरणाबाबत दिलगिरी व्यक्त केली असली तरी विरोधकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. या प्रकरणामुळे राम कदम यांचे भाजपा प्रवक्तेपद देखील पक्षाकडून काढून घेतले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)