मुंबई – ‘पसंत असणाऱ्या मुलीला पळवून आणण्यास मदत करणार’ असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांसह संघटना रस्त्यावर उतरून राम कदमांविरोधात आंदोलने करत आहेत. यामुळे राम कदम यांनी एक पाऊल मागे घेत ट्विटरवरून जाहीर माफी मागितली.

‘माझ्या घाटकोपरच्या दहीहंडीमधील वक्तव्याच्या पूर्ण व्हिडीओची सीडी न पाहता केवळ अर्धवट व्हिडीओ सर्वत्र दाखविला व पसरविला जात आहे. असे असूनही त्याचे विवेचन न करता महाराष्ट्राच्या तमाम माता-भगिनींची मनं दुखावली. त्यांचा सन्मान माझ्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे कोणताही खुलासा न करता मी अत्यंत नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे राम कदम यांनी व्हिडिओत म्हंटले आहे.

दरम्यान, राम कदम यांच्यावर कारवाईची मागणी सर्वच स्तरावरून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)