राम कदमांच्या विरोधातील आंदोलनातून कॉंग्रेस महिलांचा आपापसात वाद

कोल्हापूर – भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातल्या सर्वच कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या आंदोलनाचा निरोप वेळेत न मिळाल्यामुळे कोल्हापुरातील महिला कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आज चांगलीच जुंपली. यामुळे आंदोलनापेक्षा या वादाचीच दिवसभर चर्चा रंगली.

कदम यांचा निषेध नोंदवण्यासाठी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना दोन वाजण्याची वेळ देण्यात आली होती. कॉंग्रेस कमिटीमध्ये काही निवडक महिला कार्यकर्त्या दोन वाजता कार्यालयात पोहोचल्या. मात्र, महिला शहराध्यक्ष आणि त्यांच्या गटातील महिला वेळेवर पोहोचल्या नाहीत. त्याच्या अगोदरच पोहोचलेल्या महिलांनी हे आंदोलन उरकून टाकले.

उशिरा आलेल्या महिलांना याचा चांगलाच राग आला आणि या महिला कार्यकर्त्यांमध्ये कॉंग्रेस कमिटीच्या परिसरातच चांगलीच जुंपली. एकमेकींचा उद्धार करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे भांडण सोडविताना पुरुष कार्यकर्त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)