राम कदमांची सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या हायग्रीड कॅन्सरशी झुंज देत असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. सोनाली आणि तिचा नवरा गोल्डी बहल सोशल मीडियावरून तिच्या प्रकृतीची माहिती देत असतात. ही बातमी कळताच चाहते सोनालीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेच्या निधनाची अफवा पसरली आहे. अलीकडेच दहीहंडीत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम  यांनी आज ट्विटरवरून सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहत आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.

‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे काळाच्या पडद्याआड. सोनाली यांचे अमेरिका येथे निधन झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली’ असे ट्विट राम कदम यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून केले आहे. या ट्विटनंतर लगेचच नेटकऱ्यांनी राम कदमांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर लगेचच राम कदमांनी श्रद्धांजलीचे ट्विट डिलीट करत माफी मागितली.

‘ती एक अफवा होती. मी मागील दोन दिवसांपासून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकरच बरे होण्यासाठी आहे’, असे ट्विटकरत स्पष्टीकरण दिले आहे. परंतु नेटकऱ्यांच्या हे काही पचनी पडलेले दिसत नाही.

 

मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर सोनाली बेंद्रेच्या निधनाच्या अफवा फिरत आहेत. पण त्यात तथ्य  नाही. आज सकाळीच सोनाली बेंद्रेने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)