राम कदमांचा पाय खोलातच : सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली

मुंबई – मुलींबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर अडचणीत सापडले भाजप आमदार राम कदम यांनी आणखी एक वादग्रस्त ट्‌वीट केले आहे. अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना त्यांनी जिवंतपणीच श्रद्धांजली अर्पण केली. या ट्‌वीटमुळे राम कदम यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

राम कदम यांच्या अधिकृत ट्‌विटर अकाऊंटवरुन दुपारी दोनच्या सुमारास अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या मृत्यूचे ट्‌वीट पोस्ट केले. “हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड.. त्यांचे अमेरिका येथे निधन झाले आहे… भावपूर्ण श्रद्धांजली, असे हे ट्‌वीट होते.

परंतु अनेकांनी या ट्‌वीटवर रिप्लाय द्यायला सुरुवात केली. ही अफवा असल्याचे समजल्यानंतर दहा मिनिटांतच राम कदम यांनी ते ट्‌वीट डिलीट केले आणि “सोनालीच्या निधनाची अफवा असल्याचे सांगणारे नवे ट्‌वीट केले. सोनाली बेंद्रे यांच्या निधनाची अफवा दोन दिवसांपासून होती. मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले.

पण तोपर्यंत उशीर झाला होता. राम कदम यांच्या ट्‌वीटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा राम कदम यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. तर सोनालीच्या मृत्यूबाबत ट्‌वीट केल्याने तिचे चाहते राम कदमांविरोधात आपला रोषही व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)