रामराज्य थोडेच येणार?

     पत्रसंवाद

रघुवंशामध्ये- राजा दिलीपचे काळातील कायदा-सुव्यवस्थेचे अत्यंत सुंदर वर्णन आले आहे. काही सार्वजनिक उत्सवाचे प्रसंगी नर्तिका-कलाकार उत्तररात्री घराकडे निघाल्या असता, रस्त्याचे कडेला विश्रांतीसाठी थांबल्या, तर वाराही त्यांचे उत्तरीयास शिवण्यास धजावत नसे. मग अंगावरील आभूषणे चोरीला जाण्याचे तर दूरच.

याप्रसंगाची आठवण आली, नुकत्याच घडलेल्या उन्नाव व कठुआ येथील बलात्कार व हत्येच्या संदर्भातील सुन्न करणाऱ्या बातम्या. ज्या देशात “यभनार्यसतु पूजन्ते-‘ असे आदरपूर्वक वचन स्त्रियांचेबाबतीत काढले जाते, त्या देशात इतक्‍या नीच प्रकारची कामे व्हावीत. लागलीच विरोधक, सर्व माध्यमे यांनी भाजपवर टीकेचा भडीमार सुरू केला, पण गेली 70 वर्षे ज्यांनी देश व राज्ये सांभाळली, सत्ता मिळवण्यासाठी भल्याबुऱ्या तडजोडी केल्या, अल्पसंख्य, बहुसंख्य असे हीन राजकारण केले, अंतर्बाह्य संरक्षण व्यवस्था दुबळीच राहू दिली. नोकरशाहीला स्वैर वर्तनापासून कठोरपणे दूर सारले नाही, या व इतर अनेक गोष्टी, समाजव्यवस्था रसातळाला जाण्यास कारणीभूत आहेत.

नुसती “सबको सन्मती दे भगवान’ असली भजने, पुतळे उभारणे, मंदिरे उभी करणे याने रामराज्य थोडेच येणार आहे? त्यासाठी तर वरपासून चारित्र्य सांभाळले गेले पाहिजे, जे खालपर्यंत झिरपले गेले पाहिजे. तरच या देशाला काही भवितव्य आहे, असे म्हणता येवू शकेल. अन्यथा एखाद्या शेजारी राष्ट्राप्रमाणे देशात अराजक माजायला वेळ लागणार नाही. देशप्रेम हे फक्त भाषणांतून व्यक्त करण्यापेक्षा ते कृतीतून दाखवून देणे गरजेचे असते.

– श्‍यामसुंदर गंधे, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)