राममंदिर उभारणीचे वचन सरकारने पूर्ण करावे : संघाची अपेक्षा 

मुंबई: अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्याचे वचन केंद्र सरकारने पूर्ण करावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी व्यक्‍त केली आहे. वादग्रस्त जागेवर मशिद उभारण्यापूर्वी भव्य मंदिर अस्तित्वात होते असे पुइरावे जर मिळाले तर राममंदिर उभारले जाईल असे वचन 1994 मध्ये तत्कालिन कॉंग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. कॉंग्रेस सरकारने तेंव्हा हिंदू समाजाच्या बाजूने विचार केला होता, याची आठवण वैद्य यांनी करून दिली. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीचा विषय केवळ हिंदू किंवा मुस्लिमांपुरता मर्यादित नाही, असेही त्यांनी सांगितले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळ बैठकीच्या उद्‌घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राममंदिराच्या उभारणीच्या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ पिठासमोर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुनावणी केली जाणार आहे. यामुळे राममंदिराच्या उभारणीसाठी भाजप आणि संघातील नेत्यांकडून सरकारवर दबाव आणला जायला सुरुवात झाली आहे. मात्र सर्व पक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रार्थनेसाठी मशिद अत्यावश्‍यक नाही. प्रार्थना रस्त्यांवरही केली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय बळकावलेल्या जमिनीवर नमाज पठण केल्यास नमाज वैध मानला जात नाही. अयोध्येतील वादग्रस्त भूमी ताब्यात घेणे हा धार्मिक विषय नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे वैद्य म्हणाले.

कॉंग्रेस सरकारने म्हटल्यानुसार इतिहासातील भव्य राममंदिराचे पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावनांचा विचार करून हा भूखंड ताब्यात घेऊन मंदिर उभारणीसाठी उपलब्ध करून दिला जायला हवा, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)