राममंदिराचा मुहुर्त पुढील वर्षी कुंभमेळ्यादरम्यान जाहीर होईल : विश्‍व हिंदू परिषद 

अयोध्या: अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीबाबत दररोज नवनवीन दावे प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. या मंदिराच्या उभारणीचा मुहुर्त पुढील वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केला जाईल, असे निर्मोही आखाड्याचे रामजी दास यांनी म्हटले आहे. आज अयोध्येमध्ये झालेल्या धर्मसभेमध्ये रामजी दास यांनी ही माहिती दिली. पुढील वर्षी प्रयागमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान राममंदिराच्या उभारणीचा मुहुर्त जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले. राममंदिराच्या उभारणीला आता फारच थोड्या दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्वांनी थोडा संयम राखणे आवश्‍यक आहे, असेही रामजी दास म्हणाले.

राममंदिराछ्या उभारणीबाबत चर्चा करण्यासाठी राम भक्‍तांचे सर्वात मोठे संम्मेलन असलेली धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेसाठी साधू आणि त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नित्य गोपालदास यांनी याप्रसंगी बोलताना राममंदिराच्या उभारणीसाठी समाजातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आपल्याला मोठी आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.

-Ads-

पाच राज्यांमधील निवडणूकांमुळे लागू असलेली आचारसंहिता 23 डिसेंबर रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर पंतप्रधान राममंदिराबाबत निर्णय घेतील, असे केंद्रीय मंत्र्याने सांगितले आहे. मंदिर उभारणीसाठी हिवाळी अधिवेशनातच अध्यादेश काढला जाईल. कारण न्यायालयाकडून आम्ही निराश झालो आहोत. आता पंतप्रधान फसवणार नाहीत, अशी आशा असल्याचे राम भद्राचार्य यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)