“रामप्रहर’ने भागविली पक्ष्यांची तहान

आपण निसर्गाचा एक घटक आहोत आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे आपले आध्य कर्तव्य या भावनेतून आम्ही हा उपक्रम केला आहे. तरी वाई शहर व परिसरातील नागरिकांनी आपआपल्या इमारतीचे टेरेसवर, परिासरातील झाडांवर, गॅलरींमध्ये वरील प्रमाणे निसर्गाचा समतोल साधणाऱ्या छोट्या जीवांसाठी पाण्याची सोय करावी. रामप्रहर ग्रुपतर्फे पक्षांसाठी अशी भांडी उपलब्ध करून वाईतील शाळांमधील मुलांना मोफत देणार आहोत, अशी माहिती ग्रुपच्यावतीने देण्यात आली.

वाई -पसरणी घाटात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या “रामप्रहर’ ग्रुपने उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेऊन पक्ष्यांसाठी घाटातील झाडांवरच पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. “रामप्रहर’च्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

फेब्रुवारीपासून सूर्यनारायण तळपू लागला आहे. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. दुष्काळी पट्ट्यात न येणाऱ्या परिसरातही पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका पशु पक्ष्यांनाच बसत असतो. अनेकवेळा पाण्याविना पक्ष्यांचा जीवही जातो. तसेच पाण्यासाठी वणवण फिरत असताना त्यांची शिकारही होण्याची शक्‍यता असते. या साऱ्या गोष्टीचा विचार करत “रामप्रहर’ने पक्ष्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्याचे ठरविले. आणि त्या पार्श्‍वभूमीवर “रामप्रहर’ ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पसरणी घाटातील झाडांवर प्लास्टिकची भांडी बांधून त्यामध्ये पाणी ठेवले. या भांड्यामधील पाणी बदलण्याचेही ग्रुपच्यावतीने नियोजन करण्यात आले.

यामध्ये पसरणी घाटात अनेक ठिकाणी झाडांवर पक्षांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली असून सकाळी व संध्याकाळी घाटात फिरायला येणारे तरूण, महिला, जेष्ठ नागरिक यांनी दररोज भांडयामध्ये पाणी ओतण्याची जबाबदारी घेतली आहे. सध्या रामप्रहर ग्रुपच्या 16 सदस्यांच्या माध्यमातून 45 झाडांवर पक्षांसाठी भांडी लावण्यात आली आहेत. तरी वाई शहरातील अनेक नागरीक पसरणी घाटात मॉर्निंग वॉकसाठी दररोज जात असतात तेव्हा प्रत्येक नागरिकांनी घाटात फिरायला जाताना एक पाण्याची बाटली नेहून ठिकठिकाणी लावलेल्या भांड्यामध्ये ओतून सहकार्य करावे असे अवाहन ग्रुपच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)