रामनवमीनिमित्त सहकारनगरला अखंड हरिनासम सप्ताह

ओझर – श्रीराम नवमीनिमित्त सहकारनगर (हिवरे बुद्रुक, ता. जुन्नर) येथे गुरुवार (दि. 22) ते सोमवार (दि. 26) पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुक्तीधाम धर्मादाय विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांनी दिली. वै. हभप कोंडाजीबाबा डेरे, वै. हभप गणपतबाबा बनकर यांच्या कृपाशिर्वादाने व हभप बजरंगमहाराज कर्जुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या सप्ताहाचे हे 37वे वर्ष आहे.
या सप्ताह कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 9 ते 11 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, संध्याकाळी 7 ते 9 हरिकीर्तन व दररोज रात्रौ 9 ते 11 महाप्रसाद असा दिनक्रम करण्यात आला आहे. सप्ताहाची सुरवात वीणापूजनाने होणार असून या काळात सुभाषमहाराज लबडे, किशोरमहाराज कोकाटे, शिवाजीमहाराज साळवे, बजरंगमहाराज कर्जुलेकर यशांचे अनुक्रमे रोज रात्री तर व सोमवारी (दि. 26) सकाळी 10 ते 12 आदिनाथमहाराज जुन्नरकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. रविवारी (दि. 25) सकाळी 10 ते 12 या वेळेत शिवाजीमहाराज साळवे यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहनिमित्त दररोज रात्री कीर्तनसेवा झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन केले असून परिसरातील सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्तीधाम धर्मादाय विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ सहकारनगर, हिवरे बुद्रुक यांनी केले आहे.
सहकारनगर (हिवरे बुद्रुक, ता. जुन्नर) ःयेथील रंगरंगोटी करण्यात आल्यानंतर मनमोहक दिसणारे मुक्तीधाम मंदिर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)