रामनवमीनिमित्त श्रीगोंद्यात बजरंग दलाच्यावतीने शोभायात्रा

श्रीगोंदा – रामनवमी आणि श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमाचे श्रीगोंदा शहरात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. शहरातील मेनरोड, शिवाजी चौक, बाजारतळ येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने तरुणांचा सहभाग होता.

शहरातील मेन रोडच्या लगत असलेल्या राम मंदिरात गिरमकर महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी भागवताचार्य संतोष महाराज, नगरसेविका सुनीता शिंदे, वैशाली आळेकर, दीपक शिंदे, बाळासाहेब हिरनावळे, तात्या महाराज एरंडे, बाबा महाराज शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी बजरंग दलाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. तर शहरातील महाराजा शिंदे गोरक्षण संस्थेत बजरंग दलाच्या वतीने जनावरांना चारा वाटप करण्यात आले. यावेळी बजरंग दल शहर संयोजक कालिदास कोथिंबीरे, तालुका संयोजक गुरुप्रसाद कुलकर्णी, अमोल हिरनावळे, संजय डहाळे, नगरसेवक नानासाहेब कोथिंबीरे, सुधाकर खर्डेकर, निलेश काळे, सोनू कोथिंबीरे उपस्थित होते.
सायंकाळी बसस्थानक परिसरातून भव्य शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक गौतम कराळे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनावणे, अनिल देवराव, संतोष मोहिते, बापूराव गोरे, सतीश मखरे, नाना कोथिंबीरे आदी उपस्थित होते. यावेळी संतोषनंद महाराज यांचे आशीर्वचन झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)