रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान पश्‍चिम बंगालमध्ये तणाव

तृणमूल आणि भाजपदरम्यान हिंसाचार

कोलकाता – रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान आज भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान संघर्ष झाला. पश्‍चिम बंगालमध्ये प्रथमच अशाप्रकारची शोभायात्रा काढण्यात आली आहे. ही शोभायात्रा म्हणजे पश्‍चिम बंगालमधील हिंदूंचे एकत्रीकरण असल्याचे भाजपाने म्हटले होते. मात्र भाजपा आणि संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या शोभायात्रेला सत्तारुढ तृणमूल कॉंग्रेसने विरोध केला होता.

शोभायात्रेमध्ये शस्त्रे नेण्यास स्थानिक प्रशासनाने विरोध केला होता. हे प्रतिबंधात्मक आदेश भाजपच्या कार्यकर्त्यांनी न जुमानल्यामुळे वर्धमान आणि पुरुलिया जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्रिशुल आणि तलवारी आदी पारंपारिक शस्त्रे घेऊन भाजपचे अनेक नेते या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले होते. पुरुलियामध्ये शोभायात्रेला परवानगी नाकारण्यात आल्यावर पोलिस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला आणि तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. नंतर 15 जणांना अटक करण्यात आली. वर्धमान जिल्ह्यात पूजेच्या मंडपावर हल्ला झाला. त्या हल्ल्यामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राज्य सरकारचा शोभायात्रेला विरोध नाही, मात्र त्यानिमित्ताने अशांतता निर्माण केलेली खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यानंतर शोभायात्रा असलेल्या भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)