रामनदी भूजल अभियानास सुरुवात

पिरंगुट-रामनदी स्वच्छता अभियान समिती आयोजित रामनदी भूजल अभियानास सुरुवात झाली. भूगाव येथील चोंधेदरा पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ मुळशी- मावळचे प्रांत अधिकारी सुभाष बागडे, तहसीलदार सचिन डोंगरे, प्रभारी गटविकास अधिकारी रघुनाथ खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम रामनदीच्या खोऱ्यात भूकुम, भूगाव, बावधन बु, बावधन खु, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये राबवले जातात. आज या भागातील तिन्ही तलावांची साठवण क्षमता साचलेल्या गाळामुळे खूप खालावलेली आहे. रामनदी स्वच्छता अभियान समितीच्या वतीने या वर्षी 15 मे ते 15 जून 2018 दरम्यान रामनदीच्या खोऱ्यातील भूकुम, भूगाव आणि बावधन बु. या गावांतील चोंधे दरा (पाझर तलाव), खाटपेवाडी (पाझर तलाव), आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय भूगाव येथील साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या अभियानाचे मुख्य उद्दीष्ट आपल्या भागातील तलावांतील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविणे आहे. यामुळे आपल्या भागातील पाण्याची उपलब्धता वाढून निर्माण झालेले जलसंकट कमी होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर या भागात असलेल्या 1000 बोरवेल धारकांना प्रत्यक्ष भेटून त्यांची बोरवेल पुनःभरण करण्यासाठी आवाहन करणार आहे.
यावेळी शांताराम इंगवले, अनिल पवार, अभिजीत जाधव, राहूल शेडगे, स्वस्तिक चोंधे, वैशाली सणस, शिवाजी तांगडे, हरिभाऊ चोंधे, पंढरीनाथ चोंधे, गणेश कदम, शेलार भाऊसाहेब, नितीन चोंधे, तानाजी दगडे, सतीश इंगवले, प्रदिप चोंधे, भरत इंगळे, विशाल सुर्वे, मनोहर सणस, कुलदीप शेडगे, सुनील वाडकर, भानुदास पानसरे, राम गायकवाड, मनोज भागवत, रवी सिन्हा, मधुकर दळवी, कालीदास शेडगे, सागर धुमाळ, संदीप तांगडे इत्यादी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)