रामदेव बाबांनी लॉन्च केले स्वदेशी ‘पतंजली परिधान’

योगगुरू रामदेव बाबा यांनी स्वदेशी कपडे बाजरात आणणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत होती. या चर्चांना आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रामदेव बाबा यांनी आता कपडे व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने रामदेव बाबा यांनी आज नवी दिल्ली येथील नेताजी सुभाष प्लेसमध्ये पहिल्या ‘पतंजली परिधान’ शोरुमचे उदघाटन केले. यावेळी कुस्तीपटू सुशील कुमार आणि चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकरही उपस्थित होते.

रामदेव बाबा यांनी म्हंटले कि, पतंजली परिधान शोरुममध्ये ३ हजार वेगवेगळी उत्पादने विकली जाणार असून डिसेंबर महिन्यापर्यंत देशभरात २५ नवीन शोरूम उघडली जातील. दिवाळीनिमित्त परिधान ब्रँडवर २५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. पतंजली परिधान स्टोअरमध्ये भारतीय कपड्यांप्रमाणेच पाश्चिमात्य प्रकारचेही कपडे मिळणार आहेत. शिवाय पुरुषांच्या कपड्यांना ‘संस्कार’ तर महिलांच्या कपड्यांना ‘आस्था’ नाव देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बाबा रामदेव यांच्या प्रवक्त्यांनी म्हंटले कि, ज्याप्रमाणे खादीने स्वातंत्र्य संग्रामात स्वदेशाचे नेतृत्व केले होते. त्याचप्रमाणे परिधान देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यामध्ये नवीन क्रांतीची सुरुवात करेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)