रामदेव बाबांनी कुंभमेळ्यातील साधूंना दिला ध्रुम्रपान सोडण्याचा सल्ला 

प्रयागराज – कुंभमेळ्यात सहभागी देश-विदेशातून भक्त प्रयागराज येथे आले आहेत. योगगुरू रामदेव बाबांनी आज कुंभमेळ्यातील साधूंची भेट घेत त्यांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला. आपण श्रीराम आणि कृष्णाचे भक्त आहोत. त्यांनी आपल्या जीवनात कधीही धूम्रपान नाही केले. मग आपण केले पाहिजे का? आपण धूम्रपान सोडण्याचा संकल्प घेतला पाहिजे, असे रामदेव  बाबांनी यावेळी सांगितले.

रामदेव बाबा म्हणाले कि, आपण साधू मोक्षासाठी घर, कुटुंबासमवेत सर्व सोडतो. तर धूम्रपान का सोडू शकत नाही. असे म्हणून रामदेवबाबांनी साधूंच्या चिल्लम गोळा केल्या. आणि धूम्रपान सोडण्याचा संकल्प करण्यास सांगितला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ani_digital/status/1090754592973955073

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)