रामदेवबाबांचा नवा उपक्रम…

भारताला अध्यात्मिक सुपरपॉवर बनवण्यासाठी लोकांना संन्यास दीक्षा


रामनवमीला दिली 90 जणांना दीक्षा

हरिद्वार – योग गुरू रामदेवबाबांनी आता आपल्या येथील पतंजलीच्या मुख्यालयात नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी भारताला अध्यात्मिक सुपर पॉवर बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षित लोकांना संन्यास दीक्षा देण्याचे ठरवले आहे. याची सुरूवात त्यांनी रामनवमीच्या दिवशी 90 जणांना संन्यास दीक्षा देऊ केली. त्यात 39 महिलांचा समावेश होता. स्वता रामदेवबाबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना रामदेव बाबा म्हणाले की संन्यासी होऊ स्वताला देशाच्या सेवेत समर्पित करण्‌यासारखा दुसरा उदात्त मार्ग नाही. देशाच्या सांस्कृतीक आणि धार्मिक रक्षणासाठी हे 90 लोक आता समर्पित भावनेने काम करू शकतील. त्यांना या मार्गाने जाण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचेही त्यांनी आभार मानले. या निमीत्त यज्ञ, हवन इत्यादी कार्यक्रम श्रृषीग्राम मध्ये झाले. दीक्षा देण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये हिंदु धर्माच्या चारही वर्णातील लोकांचा समावेश होता. त्यांना या आश्रमातर्फे वेद आणि उपनिषदांचे शिक्षण देण्यात आले आहे.

संन्यास स्वीकारणाऱ्यांमध्ये अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या मास्टर्स डिग्री संपादित करणाऱ्या व्यक्तींचाहीं समावेश आहे अशी माहिती आश्रमाच्यावतीने देण्यात आली. आता हे संन्यासी देशाच्या विविध भागात जाऊन गुरू-शिष्य परंपरेनुसार कार्यरत राहतील आणि समाजाला दिशा देण्याचे काम करतील अशी माहिती त्यांनी दिली. अशा प्रकारे सुमारे एक हजार जणांना शिक्षण देऊन संन्यासी बनवण्याचा आश्रमाचा संकल्प आहे. या हजार जणांना देशाच्या कार्याला समर्पित करून सन 2050 पर्यंत भारत अध्यात्मिक सुपरपॉवर करण्याची त्यांची योजना आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)