रामदास स्वामींच्या पादुकांचा प्रचार दौरा 2 डिसेंबरपासून

समर्थ सेवा मंडळाचा पुणे, ठाणे व मुंबई असा दौरा

सातारा – राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचा यावर्षीचा प्रचार दौरा दि. 2 डिसेंबर 2018 ते 13 फेब्रुवारी 2019 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने हा पादुका प्रचार दौरा यावर्षी पुणे, ठाणे व नवीन मुंबई येथे संपन्न होणार आहे.

दि. 2 डिसेंबरला सज्जनगडाहून श्री समर्थ पादुका निघून पुणे येथील कोथरूड येथील बेडेकर गणपती मंदिरात दौऱ्यासाठी पोहचणार आहे. या पादुकांचा मुक्‍काम दि.12 डिसेंबरपर्यत असून त्यानंतर दि.21 डिसेंबरपर्यंत पादुकांचा मुक्‍काम पुणे येथील सहकार नगरच्या दशभुजा गणपती मंदिरात राहणार आहे. त्यानंतर या पादुका 31 डिसेंबरपर्यंत सदाशिव पेठेतील सदावर्ते राममंदिरात असून दि.9 जानेवारीपर्यत करवेनगर येथे विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर देवस्थान येथे हा दौरा राहणार आहे.

9 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात हा दौरा थांबून त्यानंतर 17 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान धायरी-पुणे येथील श्री स्वामी समर्थ दत्त प्रतिष्ठान येथे या पादुका दर्शन व पुजेसाठी राहणार आहेत. दि.25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान ठाणे येथील घंटाळी मैदानावर या दौऱ्याचा मुक्‍काम असून 5 ते 13 फेब्रुवारी 2019 या कालावधीत वाशी नवी मुुंबई येथील गजानन महाराज मंदिरात या पादुकांचा दौरा थांबणार आहे. व त्यानंतर हा दौरा पुन्हा सातारा येथे येवून सज्जनगडला परतणार आहे अशी माहिती समर्थ सेवा मंडळाचे विश्‍वस्त समर्थभक्‍त योगेशबुवा रामदासी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)