रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सदनात केली गणरायाची आरती

नवी दिल्ली: केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी महाराष्ट्र सदनात गणरायाचे दर्शन घेतले व आरती केली.
सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात गुरुवारी  गणरायाची  प्रतिष्ठापना झालीगणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गणरायाचे दर्शन घेतले त्यांनी गणरायाची  पूजा व आरती केलीसहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारीगणेशभक्त यावेळी उपस्थित होते.
तसेच आठवले यांनी उपस्थितांना संबोधित केलेते म्हणालेलोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सत्तेविरोधात समाज संघटन करण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाची सुरुवात केलीसामाजिक एकता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभर सामाजिक एकोपा निर्माण व्हावा असे  आवाहन श्री. आठवले यांनी यावेळी केले. महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव आयोजनाच्या माध्यमातून दिल्लीतील मराठीअमराठी गणेशभक्त एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने साजरा करतातया माध्यमातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडते व महाराष्ट्राची पंरपराही जपली जाते. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील सर्व मराठी गणेशोत्सव मंडळांसह सर्व दिल्लीकरांना  त्यांनी गणेशोत्सवाच्या  शुभेच्छा दिल्या.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)