रामदरा शिवालयात रामनवमी उत्साहात साजरी

लोणी काळभोर- येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे रविवारी (दि.25) रामनवमी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी 20 हजार भाविकांनी येथील महाप्रसादाचा लाभ घेतला. तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक 1008 देवीपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी गेल्या साठ वर्षांपूर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे. तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आजही पहाटे महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती करण्यात आली. दुपारी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12 वाजता महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर भंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. भात, आमटी, बंदीचा प्रसाद भक्तांना बाबाजी कसं ? कच्चून च्या गजरात देण्यात आला. दर्शन आणि प्रसाद घेण्यासाठी आबालवृद्ध, महिला, तरुण अशा भक्तांची झुंबड उडाली होती. दरवर्षीप्रमाणे पुण्यातील उत्तम केटरर्सचे मनमोहनसिंग यांच्या वतीने भाविकांना थंडगार कलिंगड सरबत मोफत देण्यात आले. भाविकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंग व्यवस्थित व्हावे, म्हणून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बाळासाहेब गव्हाणे, लोकेश राऊत, एस. एस. मोरे, मारुती पासलकर या पोलीस पथकाने परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. रविवारची सुट्टी, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे नेहमीपेक्षा आज येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच वाढली होती. पोलीस कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी तातडीने उपाययोजना करुन वाहतूककोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)