रामदरा येथे धुंदीबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा येथील प्रथम महंत देवीपुरी ऊर्फ धुंदीबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते, अशी माहिती विद्यमान महंत हेमंतपुरी महाराज यांनी दिली. या निमित्ताने 22 जून ते 28 जून दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. गुरुवारी (दि. 28) पहाटे पाच वाजता हेमंतपुरी महाराजांच्या हस्ते श्रीराम आणि धुंदीबाबांच्या मूर्तीला महामस्तकाभिषेक करण्यात आला. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण झाले. सकाळी नऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान हभप विनोद महाराज काळभोर यांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी साडेबारा वाजता नेहमीची आरती पार पडली. यानंतर उपस्थित साधू, संत, महंत, भक्त आणि नागरिक यांना महाप्रसादाचे वाटप केले. तीर्थक्षेत्र रामदरा हे प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच उज्जैन येथील आखाडयाशी संबंधित साधू, संत, महंत यांचे आगमन झाले होते. या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती, असे हेमंतपुरीमहाराज यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)