रामचंद्र जाधव यांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती

पुसेगाव, दि. 11 (प्रतिनिधी) ः पुसेगावचे सुपुत्र रामचंद्र शिवाजी जाधव यांना पुणे येथील दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे.
सध्या ते शिवाजीनगर (पुणे) येथे दहशतवाद विरोधी पथक कार्यालयात वरीष्ठ पोलिस निरीक्षकपदी कार्यरत होते. श्री. जाधव यांचे माध्यमिक शिक्षण येथील श्री हनुमानगिरी हायस्कुलमध्ये तर पुणे येथील फर्गसन महाविद्यावयातून त्यांनी भौतिकशास्त्र या विषयाची बी.एस्सी पदवी व एम.एस्सी पदविका प्राप्त केली. सन 1988 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस सेवेत रुजू झाले. त्यांच्या 26 वर्षांपेक्षा अधिककाळ झालेल्या सेवा कालावधीत त्यांचा उत्तरोत्तर आदरयुक्त दबदबा वाढत गेला. अत्यंत धाडसी असलेल्या श्री. जाधव यांनी कर्तव्य तत्परतेने व अथक परीश्रमाद्वारे सामाजिक जाणीवेतून पोलिसदलात सेवा बजावल्यामुळे ते 7 जुलै 2008 पासून पुणे येथे गुन्हे विभागाच्या पोलिस निरीक्षक पदावर पोहोचले. पुणे शहर, ठाणे ग्रामीण या ठिकाणी सेवा करताना त्यांनी अनेक घरफोड्या, खून, दरोडे व अन्य गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला. अत्यंत विनयशील, मितभाषी, निगर्वी पण कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अशी ख्याती असणाऱ्या श्री. जाधव यांना आजपर्यंत 750 पेक्षा अधिक बक्षिसे व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे.पुणे शहरात कार्यरत असताना त्यांनी डेक्कन, हडपसर, खडक पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखेत लक्षणीय यशस्वी तपास पुर्ण केले. आपल्या पोलिस दलातील कारकिर्दीत त्यांनी कुप्रसिध्द गुंड प्रमोद मावळणकर, विश्वनाथ कामत, कुख्यात रॉंबर्ट साळवी, संतोष ओव्हाळ, मोबीन शेख, राहूल कंधारे, सदा शेट्टी यांचा खातमा केला.तसेच बजाज टेंपोचे मॅनेजिंग डायरेक्‍टर अभय फिरोदीया यांना खंडणीसाठी धमक्‍या देणाऱ्या गॅंगस्टर्सना रंगेहाथ पकडून गजाआड करण्याची त्यांनी कामगिरी केली. या त्यांच्या सर्व लक्षवेधी कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन 2002 मध्ये शौर्य पुरस्काराने व 2009 मध्येही राष्ट्रपतीपदकाने गौरविण्यात आले आहे. सध्या ते शिवाजीनगर (पुणे) येथे दहशतवाद विरोधी पथक कार्यालयात वरीष्ठ पोलिस निरीक्षकपदी कार्यरत असतानाच पुणे येथील दहशतवाद विरोधी पधकाचे सहायक आयुक्त म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा पर्यवेक्षक श्रीधर जाधव, सलिम अत्तार, भरत निकम, यशवंत चव्हाण , बाळासाहेब जाधव, पुसेगाव ग्रामपंचायत, श्री. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, जेष्ठनागरीक संघटना, येरळा ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)