रामचंद्र खुंट येथील बेकायदेशीर इमारत पाडण्याचा आदेश

नगर: शहरातील मध्यवर्ती भागातील रामचंद्र खुंट येथे भररस्त्यावर असलेली बेकायदेशीर चार मजली इमारत पाडण्याचे आदेश महापालिकेने दिला आहे. येत्या 15 दिवसांत इमारतीचे अतिक्रमण न हटविल्यास मनपाकडून ही कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

रामचंद्र खुंट परिसरात सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यावर वैभव सुरेश पुप्पाल याने अवैधरित्या इमारत बांधलेली आहे. याविरोधात नंदकिशोर किसनलाल लाहोटी यांनी जिल्हा न्यायालयात मनाई हुकूमाचा दावा दाखल केला होता.
बांधकामास स्थगिती आदेश पारीत केलेला असताना पुप्पाल याने बांधकाम सुरूच ठेवले. अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांचा सार्वजनिक रस्ता चार वर्षांपासून बंद झाला. डिसेंबर 2014 मध्ये तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
बांधकाम हटविण्यासंबंधी न्यू लाहोदी गादी कारखान्याचे मालक रामेश्‍वर लाहोटी व नंदकिशोर लाहोटी यांनी मनपाकडे अवैध बांधकामासंदर्भात तक्रार केली होती. लाहोटी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

त्यानुसार जून 2017 मध्ये बांधकाम हटविण्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने मनपा प्रशासनाला दिले. त्यानुसार मनपाने 19 नोव्हेंबरला वैभव सुरेश पुप्पाल याच्याविरूध्द आदेश काढून दैनंदिन रस्ता बंद केल्याप्रकरणी बांधकाम पाडण्याचा आदेश दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)