रामकृष्ण मोरे महाविद्यालयास खो-खो स्पर्धेत सलग चौथ्यांदा विजेतेपद

पिंपरी- पुणे जिल्हा क्रीडा विभाग व समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय बेल्हे आयोजित आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील मुलाच्या संघाने सलग चौथ्या वर्षी विजेतेपद मिळवले. उपात्यंपूर्व फेरीत डॉ. डी.वाय. पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय आकुर्डीवर एक डाव 8 गुणांनी विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात राजमाता जिजाऊ महाविद्यालयावर एक गुण व 8 मिनिटे राखून विजयश्री संघाने खेचून आणला. तर अंतिम सामन्यात पद्‌ममणि जैन महाविद्यालय पाबळ संघावर एक गुण व 7 मिनिटे राखून विजय मिळवला. या मिळवलेल्या विजयामुळे महाविद्यालयाच्या संघातील पियुष भंगाळे, आकाश खाडे, भूषण कुंदाडे, अमर कवडे, सौरभ आव्हाने, यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय खो-खो स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघात निवड झाली आहे. खो-खो संघाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. तर संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, संदीप कदम, एल.एम. पवार, मोहनराव देशमुख, ए.ए. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.जी. चासकर यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. ज्ञानेश्‍वर चिमटे व जिमखाना चेअरमन व उपप्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)