राफेल व्यवहार : केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे राहुल गांधी यांच्यावर ‘हे’ आरोप

भारतीय जनता पार्टीने( बीजेपी ) सोमवारी आरोप केला की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राफेल व्यवहाराला निकामी करण्यासाठी एका अंतरराष्ट्रीय स्तरावर एका षडयंत्रात सहभागी आहेत आणि फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद याचा एक भाग आहेत.

बीजेपीने असा दावा केला की, काँग्रेस प्रमुख या व्यवहाराला संपवून त्यांचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित एका कंपनीला मदत करणार आहेत. बीजेपी नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी लढाऊ विमान व्यवहारामध्ये गांधी परिवाराला खेचत आरोप केला की, सरकारने वाड्राच्या संबंधीत एका कंपनीला न निवडल्याने त्यांच्यासोबतच्या या   व्यवहारावर विराम लावला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गजेंद्रा शेखावत यांनी आरोप केला की, त्या कंपनीचा मालक रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत काम करत होता. परंतु, वाड्रा यांनी या आरोपांना चुकीचे म्हटले आहे. शेखावत यांनी  पाकिस्तानचे पूर्व गृहमंत्री रेहमान मलिक याचे देखील नाव घेतले. त्यात ते मलिक यांच्या ‘ राहुल गांधी हे भारताचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात.’ या ट्विटचा दाखला देत षडयंत्रामध्ये पाकिस्तानची देखील काही भूमिका असू शकते असे  सांगितलॆ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)