राफेल विमान खरेदीच्या चौकशीची मागणी

कॉंग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे – राफेल विमान खरेदी प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, या मागणीसाठी शहर कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, यामुळे मोदी सरकारणे भ्रष्टाचाराचे टोक गाठले आहे. या शिवाय, न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र देऊन न्यायालयाचीही फसवणूक करत उद्योगपतींना याचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे या प्रकारची संयुक्त संसदीय चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी झाल्यास मोठा गैरव्यवहार उघड होणार असल्याने सरकारने या चौकशीची हिंमत दाखवावी, अशी टीका शहराध्यक्ष बागवे यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)