राफेल प्रकरण राहुल गांधी यांनी माफी मागावी

सत्ताधार पक्षाची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली: राफेल प्रकरणात सरकाला अनुकुल असा निकाल आल्याने भाजप मध्ये पुन्हा उत्त्साह संचारला असून त्याचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. सत्ताधारी पक्षाने या प्रकरणात कॉंग्रेसवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी लोकसभेत केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच नेहमीप्रमाणे प्रश्‍नोत्तराचा तास पुकारण्यात आल्यानंतर लगेच विरोधी सदस्यांनी विविध विषयावरून घोषणाबाजी करीत सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. त्याच वेळी राफेल प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करणाऱ्या घोषणा क्रॉंगेसकडूनही करण्यात आल्या. पण त्याच वेळी राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती मिळाल्याने भाजपचे सदस्यही आक्रमक झाले आणि त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे दहा मिनीटातच सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज दुपारपर्यंत तहकुब केले. तत्पुर्वी राफेल प्रकरणात लोकांची दिशाभुल केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)