राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल 

नवी दिल्ली – राफेल विमाने खरेदीप्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार नसल्याचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला होता. परंतु, त्यानंतरही काँग्रेसने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत राफेल कराराच्या चौकशीची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी राफेल करारासंबंधित निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. यामध्ये  याचिकाकर्त्यांनी १४ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या राफेल प्रकरणावरील निर्णय मागे घेण्यासाठी तसेच या याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी करण्याची मागणी केली आहे.

याचिकार्त्यांनी म्हंटले कि, या निर्णयात अनेक त्रुटी आहेत. केंद्र सरकारद्वारे न्यायालयाला देण्यात आलेल्या एक सीलबंद कव्हरमधील चुकीच्या दाव्यांच्या आधारे हा निर्णय देण्यात आला आहे. शिवाय याप्रकरणी निर्णय सुरक्षित ठेवल्यानंतर अनेक नवीन बाबी उजेडात आल्या होत्या. त्याआधारे प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज होती, असे याचिकेत म्हंटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)