राफेल प्रकरणी पवारांचे कॉंग्रेसवर शरसंधान – लोकांचा मोदींवर विश्‍वास

मुंबई – राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या कॉंग्रेसवर शरद पवारांनी शरसंधान केले आहे. नरेंद्र मोदी यांचे हेतू चुकीचे नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.

राफेल प्रकरणी पंतप्रधानांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या कॉंग्रेसच्या दाव्यांमधील हवाच शरद पवारांनी काढून घेतली आहे. राफेल प्रकरणी कॉंग्रेस करत असलेल्या मागण्यांबाबत पवारांनी प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. कॉंग्रसच्या मागण्यांमध्ये काहीही औचित्य नसल्याचे आणि लोकांचा नरेंद्र मोदींवर विश्‍वास असल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राफेल लढाऊ विमानांच्या किमती जाहीर करण्यात मोदी सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूंबाबत शंका घेण्यास मुळीच जागा नाही, असे आपले वैयक्‍तिक मत त्यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)