राफेल प्रकरणावरून शरद पवारांनी मोदींना पाठिंबा दर्शवला नव्हता – राहुल गांधी

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणावरून नरेंद्र मोदींचे समर्थन केले असल्याचे वृत्त पसरले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका सुद्धा झाली. त्यानंतर पवारांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे म्हटले होते. आज राफेल प्रकरणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी देखील पवारांनी मोदींना पाठिंबा दर्शवला नव्हता, असे स्पष्ट केले.

“शरद पवार साहेबांनी मोदींना पाठिंबा दर्शवला नव्हता, आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले होते” असे म्हणत राहुल गांधीनी पवारांना क्लीन चिट दिली.

-Ads-

दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.

 

नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी ; राहुल गांधी आक्रमक !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)